By  
on  

‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ च्या या गाण्यात वरुणसोबत श्रद्धा आणि नोराचे ठुमके

वरुण धवनच्या ‘स्ट्रीट डान्सर 3 डीचं नवीन गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. ‘लगदी लाहोर दी’ असं या गाण्याचे बोल आहेत. हे गुरु रंधावा यांच्या ‘लाहोर’ या गाण्याचं रिक्रिएशन आहे. या गाण्यात वरुण, श्रद्धा आणि नोरा रोमॅंटिक अंदाजात थिरकताना दिसत आहेत. या गाण्याला गुरु रंधावा आणि तुलसी कुमार यांचा आवाज लाभला आहे. या गाण्याला सचिन-जिगर यांचं संगीत आहे. 

 

 

या सिनेमात भारत आणि पाकिस्तान मधील डान्स ग्रुपमधील संगीत स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन रेमो डिसुजा यांनी केलं आहे. सिनेमात वरुण, श्रद्धा, कोरियोग्राफर प्रभुदेवा आणि नोरा फातेही शिवाय पुनीत पाठक झळकणार आहेत. हा सिनेमा तमिळ आणि तेलुगु भाषेतही रिलीज होणार आहे. हा सिनेमा 24 जानेवारी 2020ला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive