या अभिनेत्याची मध्यस्थी आणि बिग बी ‘झुंड’मध्ये काम करायला झाले राजी, जाणून घ्या

By  
on  

बिग बी अमिताभ बच्चन नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. पण तुम्हाला माहिती आहे का, यापुर्वी बिग बींनी तारखा जुळत नसल्याच्या कारणावरून या सिनेमाला नकार दिला होता. त्यांनी या सिनेमासाठी घेतलेले पैसेही परत केले. पण नागराजला झुंडमधील व्यक्तिरेखेसाठी बिग बीच पाहिजे होते. अशा वेळी त्यांच्या मदतीला आला आमीर खान. आमीरने बिग बींना या सिनेमात काम करण्यासाठी राजी केलं. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nagraj Popatrao Manjule (@nagraj_manjule) on

 

अमिताभ यांच्या शेड्युलला धक्का न लावता केवळ 45 दिवसांमध्ये या सिनेमाचं शुटिंग पुर्ण झालं. ‘झुंड’ हा सिनेमा विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या आयुष्यावर आधारित आहे. विजय यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देत त्यांची फुटबॉल टीम बनवली. टी सिरीज यांनी 'झुंड' सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘झुंड’ या बहुचर्चित सिनेमानिमित्ताने दोन दिग्गज कलावंत एकत्र येत असल्याने मराठी सिनेसृष्टीसह तमाम बॉलिवूड कलाकारांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येतेय.

Recommended

Loading...
Share