दीपिका आणि जेएनयु वादावर कंगनाने पहिल्यांदाच सोडलं मौन पाहा ती काय म्हणते,

By  
on  

अभिनेत्री कंगना राणावत सिनेसृष्टीत फटकळ स्वभावाची म्हणून ओळखली जाते. कोणत्याही मुद्द्यावर सडेतोड मत व्यक्त करायला ती जराही कचरत आहे. अनेक कलाकारांनाही तिच्या फटकळ स्वभावाचा अनुभव आला आहे. आताही कंगनाने एका अभिनेत्रीवर भाष्य केलं आहे. ही दुसरी तिसरी कोणी नसून दीपिका पदुकोण आहे. एकीकडे दीपिकाच्या जेएनयु भेटीमुळे वाद-विवादाला उत आला असताना कंगनाने मात्र तिचं मत व्यक्त केलं आहे. 

 

कंगना म्हणते, मला वाटतं ती तिच्या संविधानिक अधिकारांचा वापर करत आहे. ती काय करते आहे याची तिला जाणीव आहे. मला याबाबत मत प्रदर्शित करायचं नाहीये. तिची कृती योग्य की अयोग्य हे मी सांगणं चुकीचं आहे. आता यावरून सोशल मिडियात आणखी कोणता नवा वाद निर्माण होतो ते लवकरच कळेल. 

कंगना सध्या पंगाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात तिच्यासोबत नीना गुप्ता, रिचा चढ्ढा आणि जस्सी गिल हे कलाकार आहेत. अश्विनी अय्यर दिग्दर्शित हा सिनेमा 24 जानेवारीला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share