तानाजीचं यश आणि अजयचा करीअरग्राफ यांचं आहे असंही कनेक्शन

By  
on  

अजय देवगणच्या तानाजी सिनेमामुळे वर्षाची सुरुवात सुपरहिट झाली आहे. अजयसाठी देखील त्याचा हा सिनेमा खास आहे. कारण अजयच्या करीअरमधील हा शंभरावा सिनेमा आहे. तानाजी सिनेमाने आतापर्यंत 118. 91 कोटींचा गल्ला जमवला आहे. तानाजीबाबत आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे ती म्हणजे, 100 कोटींची कमाई करणारा हा अजयचा अकरावा सिनेमा आहे. सर्वप्रथम अजयच्या 'गोलमाल ३’ ने 100 कोटी क्लबमध्ये एंट्री केली होती. 

त्यानंतर 'टोटल धमाल', 'गोलमाल अगेन', 'सन ऑफ सरदार', 'सिंघम', 'सिंघम रिटर्न्स', 'शिवाय', 'दे दे प्यार दे', 'रेड', 'बोल बच्चन' या सिनेमांनीही 100 कोटींचा गल्ला जमवला होता. आता तानाजीही या यादीत आला आहे. शंभर कोटींचा बिझनेस करणा-या कलाकारांच्या यादीमध्ये आता अजय पहिल्या तिनात आला आहे. तानाजीमध्ये मराठी कलाकारांचा भरणा आहे.

Recommended

Loading...
Share