अभिनेत्री शबाना आझमी यांची प्रकृती स्थिर, सुत्रांची माहिती

By  
on  

काल मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघातात जखमी झालेल्या शबाना आझमी यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजलं आहे. या अपघातात शबाना यांच्या नाकाला आणि डोक्याला मार लागला होता. काल शबाना आझमी यांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. पण त्यानंतर त्यांना कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.

 

या अपघातात जावेद अख्तर यांना कोणातीही दुखापत झाली नाही याचं कारण म्हणजे जावेद अख्तर दुस-या गाडीत बसले होते. या अपघातात शबाना आझमी यांचा चालकही जखमी झाला आहे. एक्सप्रेसवे वर शबाना यांची कार पुढे असलेल्या ट्रकला धडकली. शबाना यांची सफारी डाव्या बाजूला धडकली. त्या डाव्या बाजूलाच असलेल्या असल्याने जास्त मार लागल्याचं समजतं. पण आता त्यांची प्रकृती स्थिर असून धोक्याच्या बाहेर असल्याचं समजलं आहे.

Recommended

Loading...
Share