अजय देवगणच्या ‘मैदान’मध्ये दिसणार राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री प्रियमणी

By  
on  

तानाजी सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा अजय देवगण आता मैदान सिनेमातून भेटीला येत आहे.  अजय या सिनेमात कोच अब्दुल सय्यद यांच्या भूमिकेत दिसत आहे. अब्दुल सय्यद यांना भारतीय फुटबॉलचे संस्थापक मानलं जातं. ते 1950 पासून 1963 पर्यंत त्यांनी भारतीय फुटबॉल कोच म्हणून काम पाहिलं आहे.

या सिनेमात अजयसोबत आधी अभिनेत्री किर्ती सुरेश झळकणार अशी चर्चा होती. पण आता तिला रिप्लेसकरून या सिनेमात अभिनेत्री प्रियमणी हिची वर्णी लागली आहे. प्रियमणीने आजवर 50 हून अधिक दाक्षिणात्य सिनेमात काम केलं आहे. याशिवाय तिला 3 वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 

प्रियमणी या पुर्वी अमेझॉन प्राईमच्या ‘द फॅमिली मॅन’ या सिरीजमध्ये दिसली होती. याशिवाय ती कंगना राणावतच्या ‘थैलैवी’मध्ये शशिकला यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अमित शर्मा दिग्दर्शित मैदान सिनेमा भारताच्या फुटबॉलच्या सुवर्णयुगावर आधारित आहे. बोनी कपूर, आकाश चावला आणि अरुणव जॉय सेनगुप्ता हे या सिनेमाचे निर्माते आहेत.

Recommended

Loading...
Share