अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचा ‘आंखे’ सिनेमा 18 वर्षांनी होणार चीन आणि सौदीमध्ये रिलीज

By  
on  

2002 मध्ये रिलीज झालेल्या ‘आंखे’ सिनेमाच्या सिक्वेलची चर्चा होताना दिसत आहे. पण या सिनेमातील कलाकारांनी मात्र या चर्चेला दुजोरा दिलेला नाही. पण या सिनेमाच्या संदर्भात आणखी एक बातमी समोर येताना दिसत आहे. रिलीजनंतर  जवळपास 18 वर्षांनी हा सिनेमा पुन्हा एकदा चीन आणि सौदी अरबमध्ये रिलीज होताना दिसत आहे. 

याबाबत निर्माता गौरांग दोषी म्हणतात, हा सिनेमा माझ्यासाठी कायमच खास आहे. या सिनेमाने मला आणि अमिताभ बच्चन यांना नवीन ओळख दिली. इतक्या वर्षांनी चीन आणि सौदी अरबमध्ये रिलीज हे प्रेरणादायी आहे.’ हा सिनेमा तेथील लोकल भाषांमध्ये डब केला जाणार आहे.

Recommended

Loading...
Share