असा आहे नागराज मंजुळेंच्या 'झुंड'मधील बिग बींचा फर्स्ट लुक पोस्टर

By  
on  

आपल्या अनोख्या शैलीनं उत्तम सिनेमे घेऊन येणारे यशस्वी दिग्दर्शक, लेखक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते नागराज मंजुळे आता एक हिंदी सिनेमा घेऊन येत आहे. ‘झुंड’ या सिनेमातून त्यांचं हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण होत आहे. या सिनेमाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॉलिवुडचे महानायक बिग बी या सिनेमात झळकणार आहेत. नागपूरचे निवृत्त क्रीडाप्रशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे. नुकतच बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवर ‘झुंड’ सिनेमाचा फर्स्ट लुक पोस्टर रिलीज केला आहे. यात बिग बी पाठमोरे दिसत आहेत. निवृत्त क्रीडाप्रशिक्षक विजय बारसे हे झोपडपट्ट्यांमधील मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देतात. आणि या पोस्टरमध्ये तसंच चित्र पाहायला मिळत आहेत. शिवाय नीट निरीक्षण केल्यास फुटबॉलही या पोस्टरमध्ये दिसेल. 


य़ा सिनेमाच्या निमित्तानं नागराज मंजुळे यांना महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे.

‘सैराट’ सिनेमानंतर नागराज मंजुळे यांची ओळख फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतभर आहे. त्यामुळे ‘झुंड’ या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढली आहे.

अमिताभ बच्चन आणि नागराग मंजुळे ही जोडी काय कमाल करतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

20 सप्टेंबरला 'झुंड' हा सिनेमा रिलीज होणार असल्याचं बोललं जातय. 

 

 

Recommended

Loading...
Share