पोट दुखेपर्यंत हसायला लावणारा ‘शुभमंगल ज्यादा सावधान’चा ट्रेलर पाहिलात का?

By  
on  

आयुष्मानच्या बहुचर्चित ‘शुभमंगल ज्यादा सावधान’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरवेळी प्रमाणे या वेळीही आयुष्मानचा दर्जेदार अनुभव या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. या सिनेमात आयुष्मान खुराणा एका होमोसेक्शुअल मुलाची भूमिका साकारत आहे. या ट्रेलरमध्ये आयुष्मान त्याच्या पार्टनरला समजावताना दिसत आहे की, मनाविरुद्ध केलेल्या लग्नात कोणीही सुखी होणार नाही.

 

 

याचवेळी त्या मुलाचे आई-वडिल तो होमोसेक्शुअल असल्याचं वास्तव मान्य करायला तयार नाहीत. या गंभीर मुद्द्याला विनोदाची उत्तम फोडणी आहे. हा सिनेमा भुषण कुमार आणि आनंद राय यांची प्रस्तुती आहे. हितेश केवल्य हे या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. या पुर्वीचा भाग प्रसन्ना यांनी दिग्दर्शित केला होता. पण ते दुस-या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याने ही संधी हितेशकडे चालून आली.

Recommended

Loading...
Share