अक्षय कुमारच्या ‘गुड न्युज’ सिनेमाने गाठला 200 कोटींचा टप्पा

By  
on  

अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांज आणि कियारा आडवाणी स्टारर गुड न्युज सिनेमा रसिकांच्या पसंतीस उतरला आहे. प्रेक्षकांनी या सिनेमाला 200 कोटीं क्लबमध्ये नेऊन पोहोचवलं आहे. 27 डिसेंबरला रिलीज झालेल्या या सिनेमाने रविवारी 1.89 कोटींचा बिझनेस केला होता. आता या सिनेमाचं कलेक्शन 201.14 कोटींइतकं आहे. याशिवाय अक्षयचा मिशन मंगल देखील मागील वर्षी 200 कोटी क्लबमध्ये पोहोचला होता.   

 
या सिनेमाचे दिग्दर्शक राज म्हणतात, ‘मी नवोदित दिग्दर्शक असूनही सिनेमाची कास्ट, प्रॉडक्शन या सिनेमाबाबत सगळंच उत्तम होतं. हा एक हलका फुलका सिनेमा आहे. प्रेक्षकांनी तो खरच एंजॉय केला.’

Recommended

Loading...
Share