अक्षय, सुनील आणि परेश रावल पुन्हा करणार हेराफेरी, सुनील शेट्टीने केलं स्पष्ट

By  
on  

हेराफेरी आणि फिर हेराफेरी नंतर या सिनेमाचा तिसरा भाग कधी येतो याची चाहत्यांना उत्सुकता आहे. या सिनेमात श्यामची भूमिका साकारत असलेला सुनील शेट्टी याने मात्र या सिनेमाबाबत खुलासा केला आहे. सुनील म्हणतो, ‘ हा भाग येईल ये हे नक्की आहे. आम्ही तिघंही यासाठी खुप उत्सुक आहोत. काही बाबी स्पष्ट व्हायच्या आहेत. यासाठीच आम्ही निश्चित स्वरुपाच्या उत्तराच्या शोधात आहोत. खरं तर हेराफेरीपासून फ्रॅंचाईजी सिनेमाची सुरुवात झाली. आणि आता आम्हीच सगळ्यात मागे आहोत.’ 

सुत्रांच्या माहितीनुसार या सिनेमाचं शुटिंग मागील डिसेंबरमध्येच सुरु होणार होतं. पण या स्क्रिप्टला आणखी रंजक बनवण्यासाठी यावर काम सुरु असल्याचं समजत आहे.

Recommended

Loading...
Share