इंडिया’ बाबतच्या बेताल वक्तव्याने सैफ अली खान आला चांगलाच अडचणीत

By  
on  

अजय देवगणच्या ‘तानाजी: द अनसंग वॉरिअर’ सिनेमात सैफ अली खानने उदयभान राठोडची व्यक्तिरेखा साकारली होती. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं खुप कौतुक होत आहे. सैफ सध्या ‘जवानी जानेमन’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच दरम्यान त्याने ‘तानाजी’ सिनेमाच्या कथेसंदर्भातही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सैफ म्हणतो, ‘इंग्रजांआधी’इंडिया’ ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती.’ त्याच्या या विधानावर नेटकरी चांगलेच भडकले आहेत.

 

 

 
नेटिझन्सनी त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे. एकाने त्याला ‘Histoy buff’ म्हटलं आहे. तर एकाने त्याला तैमुरच्या नावावरून ट्रोल केलं आहे. तानाजी सिनेमाबाबतही त्याने मत व्यक्त केलं. तो म्हणतो, ‘ मला दिलेली भूमिका खूप चांगली असल्याने मी ती साकारली. पण जेव्हा लोक म्हणत असतील की हाच इतिहास आहे, तर मी त्यांच्याशी सहमत नाही. इतिहास काय आहे हे मला नीट माहित आहे.’ या ट्रोलिंगवर सैफची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share