By  
on  

यावर्षी बॉक्स ऑफिसवर हे सिनेमे करणार धुमशान, पाहा कोणते आहेत हे सिनेमे

सुट्टीचे दिवस आणि सिनेमा रिलीजची तारीख यांचा ताळमेळ साधण्याचं आव्हान प्रत्येक दिग्दर्शकाला असतं. 2020मध्येही ही वेळ साधण्याच्या नादात अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर क्लॅश करत आहेत. पाहुयात कोणते आहेत हे सिनेमे.

 

 24  जानेवारी
स्ट्रीट डान्सर 3D VS पंगा 

कंगनाचा पंगा आणि वरुण धवन, श्रद्धा कपूर स्टारर स्ट्रीट डान्सर 3डी हे प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला बॉक्स ऑफिसवर भिडणार आहेत.

 

 21 फरवरी 

शुभ मंगल ज्यादा सावधान VS भूत पार्ट वन: द हॉन्टेड शिप 

एकीकडे धमाल मनोरंजन आणि एकीकडे भूताची दहशत या दोन विषायांवरील सिनेमे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी एकाच दिवशी सिद्ध आहेत.

 13 मार्च 

गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल  VS छलांग 

जान्हवी कपूर पहिल्यांदाच बायोपिकच्या माध्यमातून समोर येत आहे. तर राजकुमार राव आणि नुशरत कौर ‘छलांग’च्या निमित्ताने एकत्र येत आहेत.

17 एप्रिल

रूही अफ्जा VS गुलाबो सीताबो

जान्हवी कपूर आणि राजकुमार राव रुही अफजा या हॉरर कॉमेडी सिनेमातून रसिकांच्या समोर येणार आहे. तर गुलाबो सिताबोमधून अमिताभ आणि आयुष्मान खुराणा समोर येत आहेत.

 

 22 मे 

लक्ष्मी बॉम्ब  VS राधे

अक्षय कुमारचा मोस्ट अवेटेड सिनेमा ‘लक्ष्मी बाँब’ आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यांच्या सिनेमांची होणारी टक्कर यावर्षीचं मुख्य आकर्षण आहे.

  31 जुलै

शमशेरा VS भूल भुलैया 2 

रणबीर कपूर, वाणी कपूर स्टारर शमशेरा आणि कियारा आडवाणी हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आमने सामने येणार आहेत. याशिवाय 15 ऑगस्ट्ला अजय देवगणचा भुज: द प्राइड ऑफ इंडिया VS जॉन अब्राहमचा अ‍ॅटैक समोरा समोर येणार आहेत

   2 ऑक्टोबर

 सरदार उधम सिंह VS तूफान  VS सत्यमेव जयते 2

2 ऑक्टोबरला 'सरदार उधम सिंह' VS 'तूफान' VS 'सत्यमेव जयते 2 हे तीन मोठे सिनेमे रिलीज होत आहेत.

 

  25 डिसेंबर

लाल सिंह चड्ढा VS बच्चन पांडे 

 

आमिर खान आणि करीना कपूर खान स्टारर 'लाल सिंह चड्ढा'सोबत अक्षय कुमारचा अ‍ॅक्शन कॉमेडी सिनेमा 'बच्चन पांडे' यांचा सामना बॉक्स ऑफिसवर रंगेल.

Recommended

PeepingMoon Exclusive