‘तान्हाजी’ चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री

By  
on  

‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ या हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालतोय. त्यातच हा सिनेमा उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये टॅक्स फ्री करण्यात आला. मात्र वीर योद्धा तान्हाजी मालुसरे यांचा इतिहास सांगणारा हा सिनेमा महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात न आल्याचा प्रश्न उपस्थित होत होता. हा सिनेमा महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात येण्याची मागणी काही दिवसांपासून केली जात होती. सिनेमा आता महाराष्ट्रातही टॅक्स फ्री करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे. हा सिनेमा महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 

बऱ्याच सिनेमागृहांमध्ये हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करताना दिसत आहेत. तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षक रुपेरी पडद्यावर अनुभवत आहेत. काही ठिकाणी अजय देवगणच्या एन्ट्रीला पैश्याचा पाऊस तर काही ठिकाणी ‘तान्हाजी’ सिनेमाच्या तिकीटावर ऑफर देण्यात येत आहे. सगळीकडेच या सिनेमाची सध्या चर्चा सुरु आहे.

पहिल्याच दिवशी या सिनेमाने 10 कोटींचा गल्ला पार केला आणि आत्तापर्यंत या सिनेमाने 183.34 कोटी इतकी कमाई केली आहे. आता हा सिनेमा 200 कोटींकडे वाटचाल करतोय. 

 
 
 
 

Recommended

Loading...
Share