By  
on  

‘मुंबई सागा’मधील जॉन अब्राहमचा गॅंगस्टर अंदाजातील लूक आला समोर

दिग्दर्शक संजय गुप्ता यांचा ‘मुंबई सागा’ हा सिनेमा प्रदर्शनापुर्वीपासूनच चर्चेत आहे. जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. मेकर्सनी या सिनेमातील जॉनचा आणखी एक लूक समोर आणला आहे. 
या लूकमध्ये जॉनने काळ्या रंगाचा पठाणी सुट घातला आहे. त्याच्या डोळ्यावर गॉगल आहे. यासोबतच त्याने कपाळावर नामही ओढला आहे.

 

 

हा सिनेमा 80 च्या दशकातील मुंबईविषयी बरच काही सांगून जातो. या सिनेमाचं बहुतेक शुटिंग रिअल लोकेशन्सवर झालं आहे. या सिनेमातील प्रत्येक कलाकाराने अगदी जीव ओतून काम केलं आहे. जॉनच्या दंडातील स्नायूला दुखापत झाली असूनही त्याने सलग शुटिंग केलं आहे. या सिनेमात जॉनसोबत  इम्रान हाश्मी, सुनील शेट्टी, प्रतीक बब्बर, गुलशन ग्रोवर, रोहित रॉय आणि अमोल गुप्ते हे कलाकार आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive