By  
on  

भूमी पेडणेकर स्टारर ‘दुर्गावती’च्या शुटिंगला सुरुवात अक्षय कुमारने शेअर केला फोटो

भूमी पेडणेकर ‘दुर्गावती’ सिनेमातून रसिकांच्या समोर येणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलंच होतं. हा हॉरर कॉमेडी सिनेमा तेलुगु सिनेमा भागमतीचा रिमेक आहे. या सिनेमाचा मुहुर्त नुकताच पार पडला आहे. अक्षय कुमार या सिनेमाला सादर करणार आहे. त्यानेच या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. अक्षय या कॅप्शनमध्ये म्हणतो, ‘दुर्गावतीचीसुरुवात, तुमचे आशिर्वाद आणि सकारात्मकता अशीच कायम राहो!.....

 

 

 भूमी यात चंचल चौहानच्या व्यतिरेखेत दिसणार आहे. भागमतीमध्ये एका महिला अधिका-याला चौकशीसाठी एका झपाटलेल्या बंगल्यामध्ये ठेवलं जातं. त्यानंतर भुताटकीचे प्रकार सुरु होतात.  विक्रम मल्होत्रा या सिनेमाचे निर्माते आहेत तर जी. अशोक या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Let’s do this . . . #newbeginnings #durgavati #chanchalchauhan #bhopal #gratitude

A post shared by Bhumi (@bhumipednekar) on

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive