By  
on  

Movie Review: या पाच कारणांसाठी कंगना राणावतचा ‘पंगा’जरूर पाहायला हवा

कंगना राणावतचे सिनेमे चाहत्यांसाठी पर्वणी असते. तिच्या अदाकारीला मोठ्या पडद्यावर पाहणं सुखद अनुभव असतो. त्यात तिच्यासोबत उत्तम टीम असेल तर सिनेमा मास्टरपीस बनतो यात शंका नाही. पंगाही असाच आहे. आम्ही सांगत आहोत पाच कारणं ज्यासाठी तुम्ही हा सिनेमा पाहावा. 

 

 

पंगा ही लार्जर दॅन लाईफ स्टोरी नाही. ती तुमच्या आमच्यातीलच अशा व्यक्तिरेखांची गोष्ट आहे. या सिनेमातील पंगा कुणा व्यक्तीशी, कुठल्या संस्थेशी नाही तर स्वत:च्या क्षमता वाढवण्यासाठी घेतलेला पंगा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची इच्छा असलेल्या जया निगम (कंगना राणावत) ला पती आणि मुलाच्या जबाबदारीमुळे खेळता येत नाही. पण एका घटनेने तिची कमबॅक करण्याची इच्छा पुन्हा जागृत होते.

एका मुलाच्या जन्मानंतर जबाबदारी वाढलेल्या सर्वसामान्य वर्किंगवुमन बनलेल्या जयच्या कमबॅकचा रस्ता अजिबात सोपा नसतो. ही हे कसं साधते हेच या सिनेमात पाहता येईल. हा सिनेमा सरळ रेषेतील असला तरी तुम्हाला अजिबात बोअर करत नाही. त्यामुळे मध्यंतरापर्यंत सिनेमा मनोरंजन करतोच त्यानंतरही खुर्चीला खिळवून ठेवतो. 

 

अश्विनी अय्यर सारखी उत्तम दिग्दर्शक या सिनेमाला लाभल्यामुळे सिनेमाला वेगळीच उंची मिळाली आहे. सिनेमातील प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर अश्विनीने काम केलं आहे. ती स्वत: एक करिअरिस्ट महिला असल्याने कुटुंबापासून दूर असतानची घालमेल ती पडद्यावर दाखवण्यात यशस्वी झाली आहे. 

सिनेमातील डायलॉग्स तुम्हाला भावतील. याशिवाय सिनेमाच्या कास्टिंगलाही पैकीच्या पैकी मार्क्स द्यावे लागतील. कंगना, तिची मैत्रिण मीनू (रिचा चढ्ढा), पती प्रशांत (जस्सी गिल), जयाची आई (नीना गुप्ता‌) या सगळ्यांनी उत्तम अभिनय साकारला आहेच. याशिवाय कंगनाच्या मुलाच्या भूमिकेत असलेला यज्ञ भसीनही उत्तम अदाकारी सादर करतो.   

 
हा सिनेमा एक नवीन उमेद देतो. यामुळे हा सिनेमा जरूर पाहायला हवा. पीपिंगमून मराठी या सिनेमाला देत आहे 3.5 स्टार

Recommended

PeepingMoon Exclusive