‘तान्हाजी’चा नवा विक्रम, सिनेमाची बॉक्सऑफिसवर घौडदौड सुरुच

By  
on  

'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरलाय. वीर योद्धा तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा प्रेक्षकांना या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळतेय. 10 जानेवारीला रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता आणि तब्बल 15 दिवसांमध्ये या सिनेमाने आणखी नवा विक्रम केला आहे. रिलीजनंतरच्या सहाव्या दिवशीच सिनेमाने 100 कोटींचा गल्ला पार केला होता. आणि आता तब्बल 15 दिवसांमध्ये या सिनेमाने चक्क 200 कोटींचा आकडा पार केला आहे. 

याविषयी सिनेमातील मुख्य भूमिका अर्थात तान्हाजी साकारणारे अजय देवगणनेही याविषयीची माहिती सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिली.

तर अभिनेत्री काजोलने यासाठी प्रेक्षकांचे खास आभार मानले आहेत. काजोलने तशी पोस्टही केली आहे.  

 

Recommended

Loading...
Share