By  
on  

अनुपम खेर म्हणतात, 'न मैं गिरा और ना मेरी उम्मीदों के मीनार गिरे... '

बॉलुिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर सोशल मिडीयवर आणि खास करुन ट्विटरवर नेहमीच सक्रिय असतात. अनेक महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवर ते ट्विटरच्या माध्यमातून भाष्य करताना नेहमीच पाहायला मिळतात. प्रत्येक घटनेवर त्याचं एक मत ते मांडतात. सोशल प्लॅटफॉर्मवर व्यक्त केल्यामुळे ते सर्वांपर्यंत पोहचतं. अलिकडेच अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेमुळे त्यांना काही नेटकऱ्यांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. या नेटकऱ्यांवर अनुपम खेर संतापले आहेत. “मला पाडण्याचा प्रयत्न करणारे स्वत:च पडतात”असे ट्विट करुन त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

 

 

 अनुपम खेर यांनी ट्रोलर्सला या ट्वीटमधून समसणीत चपराक दिली आहे. नसरुध्दीन शाह यांनी त्यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून उत्तर दिलं होतं. 

 

नसिरुद्दीन शाह आपल्या मुलाखतीमध्ये देशामधील सध्याची परिस्थिती, देशात वाढणारा धार्मिक भेदभाव आणि यासंदर्भात चित्रपट सृष्टीमधील मोठी नावं का शांत आहेत याबद्दल मत व्यक्त केलं होतं. “मी ट्विटरवर नाही. ट्विटवर असणाऱ्यांनी आपले काय ते एक ठाम मत तयार करण्याची गरज असल्याचे मत वाटते. अनुपम खेरसारखे लोक या माध्यमांवर खूपच बोलतात. पण त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज आहे असं मला वाटतं नाही. ते विदुषक आहेत. त्यांच्याबरोबर एनएसडी, एनएफटीआयआयमध्ये असणाऱ्यांना विचारुन तुम्ही त्यांच्या स्वभावाबद्दलची खात्री करुन घेऊ शकता. ते त्यांच्या रक्तातच आहे. तुम्ही त्याबद्दल काहीच करु शकत नाही,” अशा शब्दांमध्ये शाह यांनी खेर यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive