By  
on  

पशुवैद्य कर्मचा-यांसोबत नसरुध्दीन शाह यांच्या लेकीची हाणामारी, म्हणते 'सुरुवात त्यांनी केली'

ज्येष्ठ अभिनेते नसरुध्दीन शहा यांची लेक हिबा शहा हिने एका क्लिनिकमध्ये पशुवैद्य कर्मचा-यांसोबत हाणामारी केल्याचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचं निदर्शनास आलं आहे. हे 16 जानेवारीचे प्रकरण आहे. वर्सोवा पोलिस ठाण्यात हे प्रकरण नोंदविण्यात आले आहे. 

Feline Foundation या क्लिनिकचं वर्सोवा येथे क्लिनिक आहे. हिबाने आपल्या मैत्रिणीच्या मांजरींसाठी तिच्यासोबत या क्लिनिकमध्ये अपॉईंटमेंट घेतली होती. त्यांना मांजरींची नसबंदी करायची होती. म्हणून त्यांनी आधीच अपॉईंटमेट घेतली होती. 

परंतु हिबा जेव्हा मैत्रिणीसह तिथे पोहचली तेव्हा मात्र आधीच क्लिनीकमध्ये एक सर्जरी सुरु होती. त्यामुळे त्यांना आज नसबंदी होऊ शकत नाही असं सांगण्यात आल्याने हिबाचा पारा चढला. आधीपासूनच तात्कळत असलेल्या हिबाने तेथील कर्मचा-यांसोबत हुज्जत घालायला सुरुवात केली. 

आपल्या या हाणामारीच्या वृत्तावर हिबा म्हणते, " हो मी हुज्जत घालताना त्यांच्यावर हात जरुर उचलला. पण सुरुवात त्यांनी आधी केली. मी त्यांना सतत विनंती करत होती, माझी आज अपॉंईटमेंट आहे. तरीही त्यांच्या वाद सुरुच होता.  तेथील एका महिलेने मला धक्का मारला आणि क्लिनिकमधून बाहेर जाण्यास बजावले."

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive