By  
on  

रणवीर सिंहने पुन्हा घातले असे कपडे, सोशल मिडीयावर झाली चर्चा

एखाद्या व्यक्तिने काहीतरी वेगळं केलं किंवा इतरांपेक्षा काही हटके केलं की त्या व्यक्तिची चर्चा होते. सगळ्यांमध्ये ती व्यक्ती उठून दिसते. तसचं नेहमी होत असतं अभिनेता रणवीर सिंहचं. अवॉर्ड सोहळ्यात, पार्टीतमध्ये, लाँच सोहळ्यात, एअरपोर्टवर तो कुठेही असला की सगळ्यात उठून दिसतो. याचं कारण आहे ते म्हणजे त्याचे कपडे आणि त्याचा संपूण लुक. कधी विविध रंगाच्या टोप्या, हटके गॉगल्स, शूज, रंगीबेरंगी कपडे अशा सगळ्या अवतारामुळे रणवीर सगळ्यांपेक्षा वेगळा ठरतो. आणि याचं श्रेय जातं ते त्याच्या स्टायलिस्ट निताशाला. निताशा अशा हटके पद्धतिने रणवीरला स्टाईल करते की त्या लुकची चर्चा होतेच. रणवीर सिंहच्या बाबतीत यंदाही असच झालय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

El amor es un baile! #ranveersingh in #sabyasachi #louboutin #franckmuller @sheldon.santos

A post shared by Nitasha Gaurav (@nitashagaurav) on

रणवीरने नुकताच केलेला लुक चर्चेत आला आहे आणि तो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे, तर काहींनी रणवीरला ट्रोलही केलं. रणवीर हा चक्क दीपिकाचे कपडे घालून आला असही बोललं गेलं. मात्र अशा कमेंट्स येण्याची ही पहिली वेळ नाही तर याआधी बऱ्याचदा रणवीर पत्नि दीपिकाचे कपडे घालून आला की काय अशा कमेंट्स येत असतात. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

मात्र यंदा चक्क पोल्का डॉट्सचा शर्ट, डोक्यावर पोल्का डॉट्स टोपी विथ स्कार्फ, रंगीबेरंगी लेहेंगा आणि कुल गॉगल असा रणवीरचा अवतार होता. हे फोटो रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेयर केले. फक्त चाहतेच नाही तर बॉलिवुड सेलेब्सही या फोटोंवर कमेंट करु लागले. नंतर एअरपोर्टवरही रणवीरला या लुकमध्ये स्पॉट करण्यात आलं. मग चाहत्यांनाही रणवीरच्या या लुकसोबत सेल्फि घेण्याचा मोह आवरता आला नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive