By  
on  

दीपिकाने पती रणवीरला सामानाची यादी देत भरला सज्जड दम

बॉलिवुडचं सर्वात लाडकं आणि चर्चिलं जाणारं कपल म्हणजे, रणवीर-दीपिका. दोघांबद्दलच्या अनेक ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन गोष्टी जाणून घ्यायला चाहत्यांना आवडतं. दोघंही नेहमीच चाहत्यांच्या आवडीप्रमाणे वागण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. त्यांचे कपल गोल्स नेहमीच सर्वांची मनं जिंकतात. नुकतंच 83 च्या पोस्टर लॉंचसाठी रणवीर सिंह चेन्नईत होता, तेव्हा दीपिकाने त्याच्या पोस्टवर कमेंट् करत धम्माल उडवून दिली. त्यानंतर ही पोस्ट अक्षरश: वा-याच्या वेगाने वायरल झालीय. 

रणवीरच्या 83 च्या फोटोवर दीपिकाने कमेंट करत आपल्या पतीला सोशल मिडीयावर सर्वांसमक्ष जणू एखाद्या टीपिकल पत्नीप्रमाणे खाद्यपदार्थांची जणू यादीच सोपवली. फोटोवर कमेंट करत दीपिकाने लिहिलं, 'श्रीकृष्ण या दुकानातून १ किलो मैसूर पाक आणि हॉट चिप्समधून २, अडीच किलो तिखट असे बटाट्याचे वेफर्स घेतल्याशिवाय परत येऊ नकोस '. असा सज्जड दम भरला. हे वाचून नेटक-यांमध्ये एकच हशा पिकला. 

 

ज्या सिनेमाची निर्मितीपासून चर्चा आहे, तो सिनेमा म्हणजे ‘83 द फिल्म ’. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा १९८३मध्ये वर्ल्डकप जिंकलेल्या टीमवर आधारित बायोपिक आहे. रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत आहे तर  दीपिका पादुकोण ह्यात कपिल देव यांची पत्नी रोमी देवची भूमिका साकारतेय. दीप-वीरचा लग्नानंतरचा एकत्र हा पहिलाच सिनेमा. 

‘83 द फिल्म ’ हा मल्टिस्टारर सिनेमा पुढच्या वर्षी 10 एप्रिल  2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive