हृतिक रोशनच्या 'क्रिश 4'मध्ये प्रियांका नाही तर दीपिका असेल नायिका?

By  
on  

हृतिक रोशनच्या क्रिश फ्रॅंचायझीची बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चा होत आली आहे. हॉलिवूडच्या वाटेवरचा भारतीय सुपरहिरो रसिकांसमोर सादर करण्याचा या फ्रॅंचायझीचा प्रयत्न नेहमीच वाखणण्याजोगा ठरला. हृतिक रोशनच्या या सिरीजच्या चौथ्या भागाची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहतायत. पण नुकतंच ह्या सिरीजचे फॅन एका चर्चेमुळे बरेच उत्सुक झाले आहेत, ती म्हणजे या सिरीजच्या आगामी भागांत दीपिका ही हृतिकची नायिका म्हणून झळकणार. 

तर त्याचं झालं असं की, दीपिका आणि हृतिक यांचा एक फोटो नुकताच व्हायरल झाला होता. त्यानंतर दोघांची जोडी सिनेमात पाहण्यासाठी चाहत्यांनी मागणी सुरु केली. त्यामुळे आता क्रिशच्या आगामी भागांत प्रियांका चोप्रा ऐवजी दीपिका पादुकोण नायिका म्हणून झळकली तर कोणीच अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नये. 

काही दिवसांपूर्वीच अशा चर्चा होत्या की, 'सत्ते पे सत्ता' या सुपरहिट सिनेमाच्या रिमेकमध्ये हृतिक व दीपिका झळकणार आहेत. पण अद्याप तरी यावर कुठलाच दुजोरा मिळालेला नाही. 

बॉलिवूड हंगामा या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, क्रिशच्या चौथ्या सिरीमध्ये हृतिक व दीपिका  एकत्र स्क्रीन शेअर करतील. हृतिक या सिनेमासाठी दीपिकालाच साईन करु इच्छितो. तर त्याचे वडील राकेश रोशनसुध्दा सहमत आहेत. त्यामुळे दोघांच्याही फॅन्सना लवकरच ही आनंदवार्ता मिळू शकते. 

Recommended

Loading...
Share