By  
on  

ढसा ढसा रडली दिया मिर्झा... सोशल मिडीयावर केलं ट्रोल - Dia Mirza trolled for crying at JLF 2020

दिया मिर्झा नुकतीच सोशल मिडीयावर चर्चेत आली आहे. नुसती चर्चा नाही तर ट्विटरवर दिया मिर्झा ट्रेंडिंगवर पहिल्या क्रमांकावर आहे. याचं कारण आहे दिया मिर्झाचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ. नुकतीच दिया मिर्झा जयपुर लिटरेचर फेस्टिव्हलसाठी उपस्थित होती. आणि पर्यावरण आणीबाणीच्या विषयावर बोलत असताना दियाला रडू आलं. दिया मिर्झा ही पर्यावरणप्रेमी आहे आणि पर्यावरण विषयक विविध उपक्रमांमध्येही दिया सहभागी असते. मात्र यावेळी दिया ढसा ढसा रडू लागली. “कोणाच्याही भावना समजून अश्रूंसाठी वाट मोकळी करून द्या. आणि एक गोष्ट समजून घ्या, हीच आपली खरी ताकद आहे. आपण जसं आहोत तेच खरय हा कोणताही परफॉर्मन्स नाही” असं दिया यावेळी म्हटली. 

 दियाच्या डोळ्यांत अश्रू पाहून एका व्यक्तिने तिला टिशू पेपर दिला. मात्र टिशू पेपर न घेता “ मला पेपरची गरज नाही” असं विधान दियाने यावेळी केलं. 

आणि याच विधानामुळे दिया सोशल मिडीयावर आणि खासकरून ट्विटरवर प्रचंड ट्रोल होत आहे. दियाने हे सगळं लाईमलाईटसाठी केलं असल्याचं म्हणत तिला ट्रोल केलं गेलं. तर काहिंनी गाड्या वापरणाऱ्या, लाकडी टेबल वापरणारी दिया पर्यावरणाविषयी बोलतेय असं म्हणतही ट्रोल केलं. मात्र काहिंनी सोशल मिडीयावर दियाचं समर्थनही केलय.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive