करीनासारखी हॉट फिगर आपलीही असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. अनेकजणी यासाठी जीवाचं रान करताना दिसतात. ‘टशन’मध्ये करीनाने झिरो फिगर दाखवून अनेकांना घायाळ केलं होतं. मुलगा तैमूरच्या जन्मानंतरही करीनाने स्वत:ची सुपरफिट फिगर पुन्हा मिळवली. पण करीनाने जिममध्ये जाऊन घाम गाळला नाही. तर तिने तिची डाएटीशिअन ऋजुता दिवेकरची मदत घेतली.
ऋजुताने अलीकडेच करीनाचा डाएट प्लॅन सोशल मिडियावरून शेअर केला आहे. आठवड्यातून जवळपास 4-5 तासच वर्कआऊट करून परफेक्ट फिगर मिळवण्याचा करीनाचा खास प्लॅन चाहत्यांसमोर आला आहे. करीना सध्या आमीर खानसोबत ‘लाल सिंह चढ्ढा’ या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा ख्रिसमस दरम्यान रिलीज होणार आहे.