डिस्चार्ज होऊन मुंबईत परतले ऋषी कपूर, ट्विटरवरुन दिली प्रकृतीची माहिती

By  
on  

ऋषी कपूर यांना दिल्लीतील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून आता ते मुंबईत परतले आहेत.त्यांनी स्वत:च ट्विटरवरुन ट्विट करत आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना रविवारी म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं . त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर प्रसिध्दी माध्यमं आणि चाहत्यांमध्ये कोलाहल  निर्माण झाला. पण  ऋषी कपूर यांनी खुद्द रुग्णालयात का दाखल झालो, याचं कारण सांगितलं. दिल्लीतील प्रदूषणामुळे आपल्याला इन्फेक्शन झालं असून त्या त्रासामुळे ते रुग्णालयात दाखल असल्याची माहिती दिली. 

परिवारातील सदस्य आणि मित्रहो, फॉलोवर्स आणि माझे विरोधक माझ्या प्रकृतीच्या चिंतेमुळे तुम्ही माझी जी आपुलकीने चौकशी केली त्यासाठी मी अचंबित झालो आहे. मी मागील 18 दिवसांपासून दिल्लीत शूटींग करतोय, प्रदूषणामुळे मला इन्फेकशन झालं आणि त्यामुळे मला रुग्णआलयात दाखल करावं लागलं, असं त्यांनी नुकत्याच केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

Recommended

Loading...
Share