By  
on  

पाहा Photos: शरद केळकरची लेक केशाच्या 6 व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन

अभिनेता शरद केळकर आणि किर्ती केळकर यांची गोड परी केशाने 7 फेब्रुवारी रोजी आपला 6 वा वाढदिवस साजरा केला. तिच्या या वाढदिवसाची पार्टी जोरदार साजरी करण्यात आली. बॉलिवूडचे अनेक सेलब्रिटी कपल आपल्या बच्चेकंपनींसह केशाच्या वाढदिवसासठी खास हजर होते. 

केशाच्या बर्थ डेसाठी शरद आणि किर्तीने खास पॅरिस थीम ठेवली होती. अंधेरी लोखंडवाला येथील  फुटबॉल कोर्टमध्ये ही पार्टी आयोजित करण्यात आली. केशासाठी खास डॉलचा आकारातील केक होता. एका खास गडीतून पार्टीत तिची एन्ट्री झाली.

 

 बर्थ डे गर्ल शुभ्र परीराणीच्या ड्रेसमध्ये खुलून दिसत होती. तर तिची आई किर्तीनेसुध्दा पिच कलरचा तसाच फ्रॉक परिधान केला होता. हे त्रिकोणी कुटुंब खुपच  दृष्ट लागण्यासारखे दिसत होते. 

केशाच्या बर्थ डे पार्टीसाठी खास रितेश-जेनेलिया आपल्या मुलांसह हजर होते. तर त्यांच्यासोबतच माही वीज-जय भानुशाली, हुसैन-टीना, मनीष पॉल, सुरवीन चावला, शब्बीर  आहलुवालिया आदी सेलिब्रिटींनी आपल्या बच्चेकंपनींसह खुप धम्माल केली. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive