By  
on  

'कभी ईद कभी दिवाली'मध्ये पूजा हेगडेसोबत भाईजान करणार रोमान्स

सलमान खानच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत 'कभी ईद कभी दिवाली'सिनेमाबाबत अनेक नवनवे अपडेट्स जाणून घ्यायला चाहत्यांना खुप आवडतं.आता या सिनेमात सलमानची नायिका कोण असणार हे जाणण्यासाठी चाहते आतुर झाले असतानाच आता एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या  वृत्तानुसार  'कभी ईद कभी दिवाली'मध्ये अभिनेत्री पूजा हेगडे सलामनची नायिका असणार आहे. पूजा ह्रितिक रोशन स्टारर मोहेंजो दारो आणि हाउसफुल 4 या सिनेमात नायिका म्हणून झळकली होती. 

'कभी ईद कभी दिवाली' सिनेमाचे निर्माते साजिद नाडियादवाला यांच्या म्हणण्यानुसार पूजाचा स्क्रीन प्रेसेन्स खुप छान आहे आणि म्हणूनच या आगामी प्रोजेक्टसाठी तिची निवड करण्यात आली आहे.  ‘हाऊसफुल्ल 4’ फेम दिग्दर्शक फरहाद सामजी 'कभी ईद कभी दिवाली'च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतायत. 

आता या नव्या सिनेमात सलमान आणि पूजाची केमिस्ट्री पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यंदा ईद 2020 रोजी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive