By  
on  

प्रसिद्ध फॅशन डिझायनर, पद्मश्री पुरस्कार विजेते वेंडेल रॉड्रिक्स यांचं निधन

प्रसिद्ध फॅशन डिझायनर वेंडेल रॉड्रिक्स यांचं नुकतंच निधन झालं. ते 59 वर्षांचे होते. वेंडेल यांचं गोव्यातील राहत्या घरी निधन झालं. वेंडेल केवळ फॅशन डिझायनर नव्हते तर लेखक, पर्यावरणवादी आणि समलिंगी व्यक्तींच्या हक्कासाठी लढणारे अ‍ॅक्टीव्हीस्टही होते. 28 मे 1960मध्ये गोवा येथे वेंडेल यांचा जन्म झाला. गोवन कॅथलिक कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले वेंडेल समलिंगी होते. त्यांनी Lakmé Cosmetics , DeBeers, Garden Vareli या ब्रॅंडसाठी डिझायनिंग केलं. 

 

 

2002 मध्ये पॅरीसमधील एका सोहळ्यात त्यांनी पार्टनर जेरॉम मरेल यांच्याशी विवाह केला होता.फॅशनमध्ये मिनिमॅलिझम ही संकल्पना रुजवण्यात वेंडेल यांचा मोठा सहभाग होता. याशिवाय इको फ्रेंडली फॅशनचा ट्रेंड सुरु करण्याचं श्रेयही त्यांना जातं. गोव्याची ओळख असलेली कुणबी साडी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं श्रेयही त्यांना जातं. 2003मध्ये आलेल्या ‘बूम’ आणि ‘फ़ॅशन’ या  सिनेमांमध्ये त्यांनी कॅमिओदेखील केला होता. 2014 मध्ये त्यांना केंद्रसरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलं होतं.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive