By  
on  

फॅशन डिझाइनर वेन्डेल रॉड्रिक्स यांच्या निधनाने बॉलिवुडकरांना बसला धक्का

प्रसिद्ध फॅशन डिझाइनर, समलिंगी हक्कासाठी काम करणारे एक कार्यकर्ते आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असलेले वेन्डेल रॉड्रिक्स यांचं आज सायंकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झालय.वेन्डेल रॉड्रिक्स हे मुळचे गोव्याचे होते. 2014 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. गोव्यात एक फॅशन म्युझियम उभारण्याच्या प्रक्रियेत ते बऱ्याच कालावधी पासून होते. 

 

 

मात्र त्यांच्या अचानक जाण्याने बॉलिवुडवर शोककळा पसरली आहे. कित्येक बॉलिवुड कलाकारांनी त्यांच्यासोबत काम केलं होतं. काही कलाकारांना तर या बातमीने धक्काच बसला आहे. गायिका सोना मोहपात्रालाही वेन्डेल यांच्या निधनाच्या बातमीचा धक्का बसला आहे. तिने तसं ट्विटही केलं आहे. सोना म्हणते की, “वेन्डेल मी तुला फोन करण्याचा प्रयत्न करत आहे, कृपया करुन फोन उचल”

 

 

तर फिल्ममेकर ओनिर यांनिही ट्विट करून शोक व्यक्त केलं आहे. ओनिर म्हणतात की, “ माझ्या मित्राच्या निधनाच्या बातमीने मला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. गोव्यात कॉश्मूम म्युझियम उभारण्याच्या स्वप्नपुर्तीच्या प्रक्रियेत असतानाच हे घडावं हे दुखद: आहे. तो आठवडा कायम लक्षात राहील जेव्हा नोव्हेंबर महिन्यात मी त्याच्यासोबत गोव्यात वेळ घालवला होता.”

 

 

अर्जून रामपाल, नील नितीन मुकेश, मधुर भांडारकर यांच्यासह बऱ्याच कलाकारांनी सोशल मिडीयावर दु:ख व्यक्त केलं आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive