By  
on  

रितेश- जेनेलियाचा यंदाचा व्हॅलेंटाईनचा स्पेशल प्लॅन तुम्हाला माहितीय का?

बॉलिवूडचं सर्वात क्युट आणि सेलिब्रिटी कपल म्हटलं तर रितेश-जेनेलिया ही जोडी सर्वप्रथम डोळ्यासमोर येते. सोशल मिडीयावरसुध्दा ही जोडी भलतीच अॅक्टीव्ह असते. विविध फोटोशूट व भन्नाट व्हीडीओ पोस्ट करुन चाहत्यांच्या पसंती मिळवते. 
दोघंही तितकेचं नटखट आणि मस्तीखोर आहेत पण एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले पाहायला मिळतात. दोघांना राहील आणि रेयान ही दोन गोंडस मुलंसुध्दा आहेत.  सिनेमा असो किंवा रिअल लाईफ ही जोडी नेहमीच हीट ठरते. 

इतक्या वर्षांचा सुखी संसारानंतरही  रितेश-जेनेलिया रोमॅंण्टीक केमिस्ट्री प्रत्येकाला भावते. आता व्हॅलेंटाईन डे उद्यावर येऊन ठेपलाय आणि  सर्वांच हे लाडकं कपल हा दिवस करसा साजरा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  पण रितेश-जेनेलिया हा व्हॅलेंटाईन डे हटके पध्दतीने साजरा करणार आहेत. कसा ते जाणून घेऊयात,

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Every woman needs a man that will ruin their lipstick not their mascara.. @riteishd

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad) on

यंदा रितेश-जेनेलिया व्हॅलेंटाईन डेला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या व्यक्तिमत्वाची सपत्निक मुलाखत घेताना पाहायला मिळतील. ही व्यक्ती म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांची पत्नी अमिता चव्हाण यांची. नांदेडच्या एका खास कार्यक्रमात रितेश जेनेलिया ही खास मुलाखत घेताना पाहायला मिळतील. 

 

रितेश देशमुख हा कॉंग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देसशमुख यांचा मुलगा आहे, सर्वज्ञात. त्यामुळे कॉंग्रेससोबतचं त्याचं नातं हे घट्ट आहे. तसंच रितेशचा भाऊ अमित देशमुखसुध्दा आता वडिलांचा वारसा पुढे चालवतोय. 

१४ फेब्रुवारीला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यांची पत्नी अमिता चव्हाण यांची विशेष मुलाखत घेतली जाणार आहे. महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी समारोह समितीच्या वतीने हा कार्यक्रम शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडेल.
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive