By  
on  

पाहा Trailer: ‘देसी’ बापाचा ‘अंग्रेजी’ अंदाज साकारण्यासाठी इरफान खान पुन्हा एकदा सज्ज

कॅन्सरशी लढा देऊन अभिनेता इरफान खान भारतात परतल्यानंतर तो मोठ्या पडद्यावर कधी दिसणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. इरफानच्या ‘अंगेजी Medium’ च्या ट्रेलरने ही उत्सुकता दूर केली आहे. या ट्रेलरमध्ये इरफानचा पुन्हा तोच धमाल अंदाज दिसत आहे. या सिनेमात राधिका मदान त्याच्या मुलीच्या भूमिकेत दिसत आहे. राधिका हुशार असल्याने शाळेत सर्वात पुढे असते. यासाठी तिचा सत्कारही केला जातो. 

 

 

यानंतर ती पुढील शिक्षणासाठी लंडनला जायचं ठरवते. पण आर्थिक अडचण या वाटेतील प्रमुख अडसर असतो. अशा वेळी राधिकाला इरफान लंडनमधील विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्यासाठी काय काय युक्ती करतो हे सिनेमात पाहता येईल. या सिनेमात इरफान सोबत करीना, दीपक डोब्रियाल, डिपल कपाडिया, रणवीर शौरी आणि राधिका मदान आहे. या ट्रेलरच्या आधी इरफानने एक व्हिडियो शेअर केला होता. यात सिनेमा तसंच आजारपणाबाबतही त्याने संवाद साधला होता. इरफान म्हणतो,

 

 

 

‘‘मै आज आपके साथ हूँ भी और नहीं भी… ये फिल्म अंग्रेजी मीडियम बहुत खास है. सच, यकीन मानिए, मेरी दिल की ख्वाहिश थी की इस फिल्म को उतने ही प्यार से प्रमोट करू जितने प्यार से हम लोगोंने बनाया है. लेकिन, मेरे शरीर के अंदर कुछ अनवाँटेड मेहमान बैठे हुए है उनसे वार्तालाप चल रहा है. 
देखते है किस करवट उठ बैठता है. जैसा भी होगा, आपको इतेलाह कर दिया जाएगा. कहावत है.. when life gives you lemon, you make a lemonade (आयुष्य जेव्हा तुम्हाला तुमच्या हाती आंबट लिंबू देते तेव्हा त्यांचा गोड लिंबू सरबत बनवावा) बोलने मै अच्छा लगता है पर सच मै जब जिंदगी आपके हाथ मै निंबू थमाती है ना, तो शिकंजी बनाना बहुत मुश्किल हो जाता है. लेकिन आपके पास और चॉईस भी क्या है पॉझिटिव्ह रहने के अलावा? 
इन हालात मै निंबू की शिकंजी बना पाते है की नाही बना पाते है, ये आप पर है. पर हम सबने इस फिल्म को उसी पॉझिटिव्हिटी के साथ बनाया है. पर मुझे उम्मीद है की ये फिल्म आपको सिखाएगी, हसाएगी, रुलाएगी, फिर हसाएगी शायद!’….. 
‘अंग्रेजी Medium’ हा सिनेमा 20 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive