ही आहे सलमान खानची नवी हिरोईन, पाहा कोण आहे ती?

By  
on  

भाईजान सलमान खानने आत्तापर्यंत अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला आहे. भाईजानचा हात पकडून इंडस्ट्रीत आलेल्या अनेक अभिनेत्री आहेत.  कतरिना कैफ, डैसी शहा, सोनाक्षी सिन्हा अशी लांबलचक यादी आहे.  आता यात आणखी एक नाव जोडलं जाणार आहे. पण ही आहे तरी कोण, असा सर्वांनाच प्रश्न पडला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

️ break time on point !

A post shared by Larissa Bonesi (@larissabonesi) on

 

ब्राझिलीयन मॉडेल आणि डान्सर लेरिसा बाँजी या अभिनेत्रीला सलमान खान आता मदत करणार आहे. लेरिसा याआधी अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांच्या 'देसी बॉइज' सिनेमातील सुभा होने ना दे या गाण्यात झळकली होती. यानंतर तिने टायगर श्रॉफ आणि सूरज पांचोली यांच्यासोबतही काम केलं आहे. याशिवाय तिने सैफ अली खानच्या गो गोवा गॉन सिनेमातही काम केलं होतं.

 

 

नुकतच लेरिसाने सलमान खानसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. यात दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत.हा फोटो शेअर करत लॅरिसाने एक खास मेसेज लिहला आहे, 'सलमान खानसोबत काम करणं माझ्यासाठी सन्मानाचं होतं. त्याच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. खूप सारे आभार.' त्यामुळे हे दोघं आता कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार याबातची उत्सुकता आणखी वाढलीय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I’ve got you.. under my skin #Repost

A post shared by Larissa Bonesi (@larissabonesi) on

 

Recommended

Loading...
Share