आमिर-करीनाचा 'लालसिंग चड्ढा' येमार रसिकांच्या भेटीला

By  
on  

आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने 'लाल सिंह चड्डा' मधून करिना कपूर खान आणि आमिर खान यांचा एक जबरदस्त लुक प्रेक्षकांसमोर निर्मात्यांनी उलगडला आहे. 2020 या यंदाच्या वर्षातील मोस्ट अवेटेड सिनेमांपैकी हा एक सिनेमा आहे. लालसिंग चड्ढा’ या तील करीनाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यासोबतच या चित्रपटाची रिलीज डेटही सांगण्यात आली आहे. २०२० मध्ये नाताळला हा सिनेमा रसिकांच्या भेटीस येतोय. 

'लाल सिंह चढ्ढा' हा इंग्रजी सिनेमा फॉरेस्ट गम्पचा ऑफीशियल रिमेक आहे. आपला मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णीने या सिनेमाची कथा लिहली आहे. करिनाला या सिनेमातील लुकमध्ये पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली असणार यात शंका नाही. 

'3 इडियट्स' (2009)  नंतर करिना आणि आमिर खान एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. त्यामुळे या दोघांची केमिस्ट्री पाहणं रंजक ठरणार आहे. 
 

Recommended

Loading...
Share