By  
on  

Big boss 13: सिद्धार्थ शुक्ला बनला विजेता ! असा होता त्याचा प्रवास

बिग बॉसच्या या सीझनमध्ये सगळ्यात जास्त चर्चा कुणाची झाली असेल तर सिद्धार्थ शुक्लाची. एरवी पडद्यावर कूल हॅण्डसम हंकचा रोल करणारा सिद्धार्थ प्रत्यक्षात मात्र भलताच तापट आहे. त्याच्या आणि रश्मीच्या भांडणाने या सीझनला चांगलाच टीआरपी मिळवून दिला. पण फिनालेला मात्र सिद्धार्थ शुक्ला आणि असीम रियाज यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळाली. पण सिद्धार्थ विजेता ठरला. 

यात शहनाज गिल रनर अप ठरली. सिद्धार्थचं आधीपासूनच फॅन फॉलोविंग जबरदस्त होतं. त्यासाठी ट्वीटरवर #SidharthShuklaForTheWin हा हॅशटॅगही चालवला गेला. फिनालेमधून रश्मी बाहेर पडल्यानंतर कोण जिंकणार याची उत्सुकता वाढत होती. पण सिद्धार्थच्या निवडीने यावर शिक्कामोर्तब केलं.

Recommended

PeepingMoon Exclusive