By  
on  

पाहा अभिनेत्री कंगना राणौतचा 'तेजस'मधून फर्स्ट लुक आला समोर

अभिनेत्री कंगना राणौतचा तेजस सिनेमातून फर्स्ट लुक नुकताच रसिकांच्या भेटीला आला आहे. यात कंगना एका एअर फोर्सच्या पायलटच्या दमदार रुपात पाहायला मिळतेय. जुलैपासून या सिनेमाच्या शूटींगला सुरुवात होणार आहे. पण अद्याप या सिनेमाच्या रिलीजबाबत कोणतीही माहिती उघड करण्यात आलेली नाही. 

प्रचंड आत्मविश्वासासह कंगना पाहायला मिळतेय. हातात हेल्मेट, डोऴ्यावर गॉगल आणि पार्श्वभूमीवर फायटर जेट यामुळे कंगनाचा हा जोशपूर्ण स्वॅग रसिकांना आवडला नाही तरच नवल. देशासाठी झटणा-या एअरफोर्स पायलटच्या भूमिकेतील कंगनाला पाहण्यासारेच उत्सुक आहेत. दिग्दर्शक सर्वेश मेवाडा या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून रॉनी स्कूवाला यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. 

अलिकडेच पंगा सिनेमातील भूमिकेमुळे कंगनाचं प्रचंड कौतुक झालं. घरच्या जबाबदा-या सांभाळून कबड्डीपट्टू म्हणून सेकंड इनिंग खेळणा-या आईची ही गोष्ट तिने प्रभावीपणे पडद्यावर मांडली. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive