By  
on  

सोनम कपूर म्हणते, 'मोहन भागवत यांचं वक्तव्य मागासलेलं आणि मूर्खपणाचं'

सरसंघचालक मोहन भागवत यांनी घटस्फोटासंदर्भात एक वक्तव्य केलं आणि त्यावर अभिनेत्री सोनम कपूरने ट्विटरवरुन दिलेली प्रतिक्रीया सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या शिक्षण आणि संपन्नता यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढलं आहे ,असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावर सर्वच स्तरातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी या वक्तव्याची निंदा केलीय तर काहींनी याचं समर्थन केलं आहे. 

सोनम कपूर भागवतांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया देताना म्हणते, "हे फारच मागासलेले विचार असून  हे मूर्ख वक्तव्य आहे. कोणता समजूतदार मनुष्य असं वक्तव्य करतो?"

'सध्या घटस्फोटाची वाढती प्रकरणं समोर येत आहेत. संपन्न आणि सुशिक्षित कुटुंबांमध्येच घटस्फोटाची प्रकरणं जास्त आहेत. कारण शिक्षण आणि संपन्नतेमुळे लोकांमध्ये अहंकार आणि उद्धटपणा येतो. यामुळे कुटुंबं आणि संसार विभागले जातात, तुटतात.'असं भागवत म्हणाले होते. एकंदरच त्यांनी घटस्फोटासाठी शिक्षण आणि संपन्नतेला जबाबदार धरलं आहे. परंतु सोनमने हे हास्यास्पद असल्याचं आपलं परखड मत ट्विटरवरुन व्यक्त केलं. त्यामुळे सोनमच्या बेधडक ट्विटची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive