By  
on  

किती गोड ! रणवीर सिंहचा फिल्मफेअर पुरस्कार चक्क तिच कवटाळून बसली

सिनेजगतासाठी  फिल्मफेअर पुरस्कार हा सर्वोच्च मानाच्या पुरस्कारांपैकी एक. रणवीर सिंह म्हणजे बॉलिवूडचा एनर्जी मॅन. त्याच्या गली बॉय सिनेमाचीच यंदाच्या फिल्मफेअरमध्ये बोलबाला होता. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 13 पुरस्कार या सिनेमाने पटकावले. या सिनेमासाठी रणवीरलासुध्दा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले. पण रणवीर घरी परतला आणि चक्क त्याचा हा पुरस्कार कोणीतरी हिसकावून घेतला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Best Actor in a Leading Role #gullyboy @filmfare ️

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

धक्का बसला ना, आणि आता तुम्ही म्हणाल रणवीरचा पुरस्कार नेमका हिसकावला तरी कोणी? तर, रणवीरचा हा पुरस्कार हिसकावणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून, खुद्द त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोणच आहे. रणवीरनेच स्वत:च  सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयीची पोस्ट केली आहे. ज्यामध्ये दीपिका पुरस्कार घेऊन बेडवर झोपलीय आणि स्मित हास्य करत खुपच क्यूट दिसतेय. त्यावर रणवीरने भन्नाट कॅप्शन दिलं आहे. " व्हेन माय लिटल लेडी मेट माय ब्लॅक लेडी"

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

When my Little lady met my Black lady

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

रणवीर आणि दीपिका ही जोडी बॉलिवूडकर आणि चाहत्यांची खुप लाडकी आहे. त्यांच्यामुळे नेहमीच कपल गोल्स मिळतात. दोगंही एकमेकांची सोशल मिडीवरुन अनेकदा थट्टा-मस्करी करताना पाहायला मिळतात. त्यांच्यातलं प्रेम असंच बहरत जावो हीच सदिच्छा.


 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive