By  
on  

करणने केलं स्पष्ट , सुहाना खान आणि 'बिग बॉस 13' फेम आसिम रियाजला तो 'SOTY3'मधून लॉंच करणार नाही

'बिग बॉस 13'चा यंदा जबरदस्त बोलबाला होता. हा सीझन साग्रसंगीत पार पडल्यानंतर नुकतंच शाहरुखची लेक सुहाना खान आणि 'बिग बॉस 13' चा  पहिला रनर अप आसिम रियाज हे 'स्टुडंट ऑफ द ईअर 3' मधून लॉंच होणार अशा वावड्या उठल्या होत्या. पण या बातम्या बिनबुडाच्या असल्याचं खुद्द करण जोहरनेच आता ट्विट करुन सांगितलं आहे. 

आज सकाळीच करणने या बातम्या निराधार असल्याचं ट्विटरवरुन स्पष्ट केलं. करण ट्विटमध्ये म्हणतो," 'SOTY3'बाबत फिरणा-या बातम्यांमध्ये अजिबात तथ्य नाही. माझी सर्वांना विनंती आहे की, कृपा करुन अशाप्रकारच्या बातम्या चालवू नका.ठ

धर्मा प्रोडक्शनशी निगडीत एका सूत्रांनी असं सांगितलं," सुहाना खान आणि 'बिग बॉस 13' चा पहिला रनर अप आसिम रियाजला 'SOTY3' मधून लॉंच करण्याचं फिरत असलेलं वृत्त धांदात खोटं आहे. सुहानाचा बॉलिवूड डेब्यूची बातमी नेहमी ट्रेण्डमध्ये असते आणि आसिम बिग बॉसमुळे टॉप ड्रेंडमध्ये होता,त्यामुळे लोकांनी याची बातमीच करुन टाकली. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive