By  
on  

पाहा '83 द फिल्म' मध्ये हुबेहूब कपिल देव आणि रोमी देवच्या रुपात रणवीर- दीपिका

कमालीची महत्त्वकांक्षा आणि जिंकण्याच्या जिद्दीने पेटलेल्या  क्रिकेटर  पतीवर आपलासुध्दा कमालीचा विश्वास आहे, असं ती त्याच्या डोळ्यात पाहून सांगतेय. तु खेळ मी आहे पाठीशी. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा बायोपिक 83 द फिल्म लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात अभिनेता रणवीर सिंह कपिल देव यांची प्रमुख भूमिका साकरतोय. काही दिवसांपूर्वीच रणवीरचा या सिनेमातील लुक उलगडला होता आणि त्यावर सर्वांनीच पसंतीची पावती दिली कारण तो, हुबेहुब कपिल देव यांच्या सारखाच दिसत होता. आता या सिनेमातील दीपिका पादुकोणचा लुक सोशल मिडीयाद्वारे चाहत्यांसमोर आला आहे. दीपिकासुध्दा रोमी देव यांच्यासारखीच वाटतेय. त्यामुळे ही जोडी पद्यावर कमाल दाखवणार यात शंका नाही. 

 

1983 च्या वर्लडकपमध्ये कपिल देव यांनी झिम्बॉबेविरुध्द 175 रन्सची खेळी केली होती. ही भारत- झिम्बॉम्बे मॅच सर्वात अविस्मरणीय अशी ऐतिहासिक मॅच आहे. पण त्याचं प्रसारण आज उपलब्ध नाही, कारण तेव्हा ही मॅच चित्रितच करण्यात आली नव्हती. हा सिनेमा याच वर्ल्डकप मॅचभोवती उलगडतो. साजिद नाडियाडवाला, मधु मंतेना शिबाशीष सरकार आणि विष्णु इंदूरी यांच्या प्रॉडक्शनखाली बनलेला हा सिनेमा कबीर खान दिग्दर्शित करत आहेत. हा सिनेमा येत्या 10 एप्रिल 2020ला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive