'स्वदेस'च्या ‘कावेरी अम्मा’चं निधन, आशुतोष गोवारीकर यांनी केलं ट्विट

By  
on  

'स्वदेस' सिनेमातील  शाहरुख खानची कावेरी ्अम्मा आठवतेय का, हो त्याच कावेरी अम्मा ज्यांनी भारतात परतलेल्या शाहरुखला लळा लावला. कावेरी अम्मा ही भूमिका साकारणा-या दाक्षिणात्य अभिनेत्री किशोरी बल्लाळ यांचं निधन झालं आहे. 2004 साली आसुतोष गोवारीकर दिग्दर्शित स्वदेस सिनेमातील त्यांची ही भूमिका सर्वांच्याच लक्षात राहिली.मिडीया रिपोर्ट्नुसार प्रकृती अस्वास्थ्यामुळे किशोरी यांना बंगळुरुच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु मंगळवारी त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. 

दिग्दर्सक आशुतोष गोवारीकर यांनीसुध्दा ट्विट करुन किशोरी बल्लाळ यांना श्रध्दांजली वाहिली. “किशोरी बल्लाळ यांच्या निधनामुळे प्रचंड दु:ख होत आहे. तुमच्या स्वभावातला दयाळूपणा, सहृदयपणा आणि प्रेम यामुळे सदैव  तुम्ही लक्षात रहालं. तसंच स्वदेसमधील तुम्ही साकरालेली कावेरी अम्मा आमच्या  कायम आठवणीत राहण्यासारखी आहे. खरंच तुमची खुप आठवण येईल”

Recommended

Loading...
Share