'अतरंगी रे'मध्ये सारा अली खानचा डबल रोल?

By  
on  

अलिकडेच 'अतरंगी रे' या आनंद एल राय यांच्या सिनेमाची घोषणा झाली. या सिनेमात सारा अली खानसोबत बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार आणि दाक्षित्य अभिनेता धनुष असल्याने सध्या याची बरीच चर्चा सुरु आहे. 

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सारा या सिनेमात बिहारमधील एका तरुणीची व्यक्तिरेखा साकारत आहे. तसंच ती सिनेमात धनुषसोबत रोमान्स करताना पाहायला मिळणार आहे आणि अक्षय या सिनेमात पाहुणा कलाकार म्हणून झळकतोय. पण दिग्दर्शक आनंद एल राय यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. तर आता सूत्रांच्या माहितीनुसार अक्षय व धनुष दोघांसोबतच सारा रोमान्स करताना दिसेल. तसंच या तिघांचा कुठलाही लव्ह ट्रॅंगल सिनेमात नाही. कारण, त्यांच्या व्यक्तिरेखा दोन वेगळ्या ट्रॅकवरच्या असतील. 

पुढील वर्षी व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर 'अंतरंगी रे' रसिकांच्या भेटीला येणार आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत आपण पूर्वीपासूनच आनंद राय यांच्यासोबत काम करण्या उत्सुक होतो असं अक्षयने सांगितलंय. शाहरुख खानचा 'झिरो' हा सिनेमा आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केला होता. आता ब-याच कालावधीनंतर ते 'अंतरंगी रे' घेऊन रसिकांसमोर येत आहेत.
 

Recommended

Loading...
Share