स्त्री सशक्तीकरणाचा खरा अर्थ सांगणारी शॉर्टफिल्म ‘देवी’

By  
on  

आजकाल महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. नेमकं याचं विषयावर भाष्य करणारी शॉर्टफिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काजोल, श्रुती हसन, नेहा धुपिया, नीना कुळकर्णी, मुक्ता बर्वे, संध्या म्हात्रे, रमा जोशी, शिवानी रघुवंशी आणि यशस्विनी दायमा अशी तगदी स्टारकास्ट या सिनेमात आहे. 

 

 

‘देवी’ ही काजोलची पहिलीच शॉर्टफिल्म आहे. यात ती ज्योती नावाची व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. केवळ दोन दिवसात या शॉर्टफिल्मचं शुटिंग पुर्ण झालं आहे. महिलांवरील हिंसा कोणत्याही प्रकारची हिंसा सहन केली जाऊ शकत नाही असा या शॉर्टफिल्मचा आशय आहे. ही एका नऊ महिलांची कथा आहे. या समाजातील वेगवेगळ्या स्तरातून आलेल्या आहेत. त्यांच्यावर होत असलेला अन्याय, कुचंबणा त्या एकमेकिंशी शेअर करतात. निरंजन अयंगार या शॉर्टफिल्मचे निर्माते आहेत. प्रियांका बॅनर्जीने ही शॉर्ट फिल्म डायरेक्ट केली आहे.

Recommended

Loading...
Share