Good News! शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना कन्यारत्न, सरोगसीने दिला मुलीला जन्म

By  
on  

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा या दाम्पत्याला कन्यारत्न झालं आहे. दोघांनी लेकीचं नाव 'समीशा' असं ठेवलं आहे. सरोगसीच्या आधारे त्यांनी मुलीला जन्म दिला. शिल्पा शेट्टीने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम हॅण्डलवरुन मुलीचा फोटो शेअर करत आज महाशिवरात्रीनिमित्त ही गोड बातमी सर्वांना दिली आहे. 

 १५ फेब्रुवारीलाच शिल्पाच्या मुलीचा जन्म झाला.. परंतु तिने सहा दिवसांनंतर ही बातमी चाहत्यांना दिली आहे.शिल्पाने इन्स्टाग्रानवर एक फोटो पोस्ट करुन ही आनंदाची बातमी दिली. या फोटोमध्ये शिल्पाची मुलगी तिचे बोट पकडताना दिसत आहे. “ओम श्री गणेशाय नमः। आमच्या प्रार्थनेचे उत्तर आम्हाला एका दैवी रुपाने मिळाले आहे.”

 

Recommended

Loading...
Share