या देशांमध्ये 'शुभ मंगल..ज्यादा सावधान'ला नो एन्ट्री

By  
on  

आयुष्यमान खुराना स्टारर 'शुभमंगल ज्यादा सावधान' हा सिनेमा आज 21 फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. पण प्रदर्शनापूर्वीच या सिनेमावर दोन देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. दुबई आणि यूएईमध्ये या सिनेमाला  बंदी घालण्यात आली आहे. समलैंगिक संबंधांवर हा सिनेमा भाष्य करतो. या आठवड्याच्या सुरुवातीला सीबीएफसीने सिनेमाला यू/ए सर्टिफिकेट दिलं होतं. सिनेमातील लिपलॉक सीनलाही मान्यता मिळाली होती.

पण हा सिनेमा सहकुटुंब पाहता येऊ शकेल असा मनोरंजनाने भरपूर करण्यावर भर देण्यात आल्याचं निर्मात्यांनी सांगितलंय. पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नसल्याचं दिसतंय. 

Recommended

Loading...
Share