By  
on  

कंगनाची बहिण रंगोली लवकरच घेणार एक मुलगी दत्तक, कंगना ठेवणार हे नाव

बॉलिवूड क्विन कंगना राणौत आणि तिची बहिण रंगोली चंडेल या नेहमीच चर्चेत असतात. सिनेसृष्टी असो किंवा राजकीय वर्तुळ प्रत्येक ठिकाणी एखाद्या व्यक्तीवर निशाणा साधल्याने त्या नेहमीच चर्चेत येतात. पण रंगोलीचं स्वत:चं एक मत असतं आणि ते ट्विटरवरुन रोखठोक मांडते. आता ती एक मुलगी दत्तक घेणार असल्याची घोषणा तिनेच आपल्या ट्विटरवरुन केली आहे. पण इतकंच नाही तर ही मुलगी दत्तक घेण्यापूर्वीच कंगनाने तिचं नावसुध्दा सुचवून ठेवलं आहे. 

रंगोली ट्विटरवर सांगते, "मला एक मुलगा आहे.पण माझ्या पतीला  आणखी एक मूल हवं आहे, त्यामुळे आम्ही मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतलाय. मी सरोगसीसाठी जाणा-या दाम्पत्यांना रोखण्यासाठी  प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याला त्या मुलांना घर द्यायला हवं जे आई-वडीलांपासून वंचित आहेत."

ती पुढे सांगते, माझी बहिण कंगनाने मला या निर्णयासाठी खुप प्रोत्साहित केलं आहे. तर मी आणि माझे पती अजय यांनी सर्व कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण केल्या असून काही महिन्यातच  एक गोड परी आमच्या घरी येईल.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive