By  
on  

गायक मिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या

सुप्रसिध्द गायक मिका सिंगच्या मॅनेजरने आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. तिचं नाव सौम्या सोयब खान आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती मिकाच्या स्टुडिओमध्ये कार्यरत होती. याप्रकरणी पोलिस अधिक चौकशी करत आहेत. 

वर्सोवा पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना 2 फेब्रुवारीची आहे. सौम्या ही 28 वर्षीय युवती होती. तिने आत्महत्येपूर्वी कोणतीही सुसाईड नोट लिहलेली आढळली नाही. झोपेच्या गोळ्यांचा अतिरिक्त डोस घेतल्याने स्टुडिओतच तिने अखेरचा श्वास घेतला. आता अधिक तपास केल्यानंतरच सविस्तर माहिती उलगडू शकेल. 

मिका सिंगने सौम्याच्या मृत्यूनंतर इंस्टाग्रामवर पोस्ट सौम्याने लहान वयातच जगाचा निरोप घेतल्याने दु:ख व्यक्त केले आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive