By  
on  

 संजय लीला भंसाळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमावरून गंगूबाईचे कुटूंब नाराज 

निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भंसाळी ‘गंगूबाई काठियावाडी’ हा सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमात अभिनेत्री आलिया भट ही मुख्य भूमिका म्हणजेच गंगूबाई यांच्या भूमिकेत दिसेल. या सिनेमाचा फर्स्ट लुकही नुकताच रिलीज करण्यात आला होता. मात्र हा फर्स्ट लुक पाहुन खऱ्याखुऱ्या गंगूबाईंच्या कुटूंबात नाराजी असल्याचं समोर आलयं. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत गंगूबाई यांच्या कुटूंबाने या सिनेमाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. या सिनेमात चुकीची माहिती दाखवल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 


हा सिनेमा हुसेन जैदी यांच्या ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. मात्र या पुस्तकातील माहितीही अगदी चुकीची असल्याचं गंगूबाई यांच्या मानसकन्या बबिता गौडा म्हणाल्यात. नुकतच सिनेमाचं पोस्टरही प्रदर्शित झालं होतं. या पोस्टरमध्ये असलेला गंगूबाई यांचा लुकही चुकीचा असल्याचं त्यांचे परिवार म्हणत आहेत. एवढचं नाही तर पोस्टरमध्ये दाखवलेली पिस्तूल हे देखील चुकीचं असल्याचं त्यांनी सांगीतलय. गंगूबाईंनी कधीच हातात पिस्तूल घेतली नसल्याचं ते बोलले. गंगूबाई ही अनाथांना आसरा देणारी, मदत करणारी ‘गंगू माँ’ होती ती माफिया क्वीन नव्हती अशीही माहिती त्यांनी दिली.


त्यामुळे हा सिनेमा आता वादाच्या भोवऱ्यात सापडणार असल्याचं चित्र पाहायला मिळतय. संजय लीला भंसाळी यांच्या मागील सिनेमांच्या बाबतीतही बऱ्याचदा विविध वाद समोर आले होते. तेव्हा या सिनेमाच्या बाबतीतही हा नवा वाद समोर येत असल्याचं पाहायला मिळतय. या वादावर आता संजय लीला भंसाळी काय तोडगा काढतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive