By  
on  

'तुझी रोजच आठवण येते', श्रीदेवी यांच्या दुस-या पुण्यतिथीनिमित्त जान्हवीने शेअर केली पोस्ट

दोन वर्षांपूर्वी बॉलिवूडच्या चांदनीने म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतल्या. ह्या सुपरस्टार अभिनेत्रीच्या निधनाने अवघा देश हळहळला. श्रीदेवी यांच्या पश्चात त्यांचे निर्माते पती बोनी कपूर आणि दोन मुली जान्हवी व खुशी असा परिवार आहे. आज श्रीदेवी यांची दुसरी पुण्यतिथी.  त्यानिमित्त त्यांची लेक आणि अभिनेत्री जान्हवी कपूरने खास फोटो शेअर करत आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे. जान्हवी आपल्या आईच्या खुप जवळ होती. जान्हवी आपल्या पोस्टमध्ये म्हणते, तुझी आठवण दररोज येते. 

श्रीदेवी यांचा अपघाती मृत्यू 8 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईत झाला. भाच्याच्या लग्नासाठी दुबईत असलेल्या श्रीदेवींचा मृत्यू बाथटबमधील पाण्यात बुडून झाल्याचे रिपोर्ट्स सांगतात. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Miss you everyday

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

श्रीदेवी..दाक्षिणात्य अभिनेत्री ते बॉलिवूड सुपरस्टार. अनेक सुपरहिट सिनेमांमधून आपल्या दर्जेदार अभिनयाचा ठसा त्यांनी उमटवला. ‘ज्युली’ सिनेमाद्वारे त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केल. ‘हिंमतवाला’, ‘घरसंसार’, ‘कर्मा’, ‘लम्हे’, ‘चांदनी’, ‘मिस्टर इंडिया’, ‘सदमा’,’चालबाज’, ‘जुदाई’, ‘रुप की रानी चोरो का राजा’, ‘इंग्लिश विंग्लीश’ अशा त्यांच्या सुपरहिट सिनेमांची यादी न संपणारी आहे. ‘मॉम’ हा त्यांच्या कारकिर्दीतला अखेरचा सिनेमा ठरला.

Recommended

PeepingMoon Exclusive