By  
on  

कंगना की जयललिता? 'थलईवी'चा नवीन लूक पाहून चाहत्यांची प्रतिक्रिया

अभिनेत्रा कंगना रणावत पंगानंतर आता ‘थलाईवी’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा जयललिता यांचा जीवनावर आधारित आहे. या सिनेमातील फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर आला होता. आता या सिनेमातील दुसरा लूक समोर आला आहे. या लूकमध्ये कंगना अगदी जयललितांसारखी दिसत आहे. कंगनाची बहिण रंगोलीने कंगनाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. ती या पोस्टरमध्ये म्हणते, ‘ आज जया अम्माची बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी आहे. थलाईवी एक क्रांतिकारी नेता’… 

 

 

यासोबतच रंगोलीने अ‍ॅड केलेल्या कंगनाच्या फोटोमध्ये ती म्हणते, कंगाना थलाईवीच्या रुपात. कोणत्याही प्रॉस्थेटिक किंवा स्पेशल इफेक्टशिवाय कंगना जया अम्मासारखी दिसत आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर काहीही होऊ शकतं.’  हा सिनेमा हिंदी आणि तामिळ या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तामिळमध्ये या सिनेमाचं नाव ‘थलाइवी’ आहे. तर हिंदीमध्ये ‘जया’. ‘थलाइवी’ हा सिनेमा विजय यांनी दिग्दर्शित केला असून २६ जून २०२० रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive